भाऊ आरोग्य कार्ड - एक स्वास्थ्य आधार!

फाऊंडेशन

भाऊसो. ना. गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन


image
image

             भाऊसो. ना. गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन (नोंदणी क्र. महा/२१६२८/जळगाव) ही संस्था मा. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित समाजाच्या प्रत्येक शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून सामाजिक कार्यासाठी झटणारी संस्था आहे. आपले पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव जी पाटील हे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या धोरणास मानून मागील २५ वर्षांपासून लोक सेवेचा वसा पुढे चालवत सामान्य जनतेची सेवा करत आहे. आपल्या जळगाव ग्रामीण मधील जनतेचे आरोग्य तसेच जीवनमान उंचाविणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन सामाजिक बांधिलकी जपत काम करत आहे.

             भाऊसो. ना. गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन ही संस्था प्रामुख्याने आरोग्य सेवा, शैक्षणिक विकास, सांस्कृतिक कार्य, क्रिडा, कृषी विकास, पर्यावरण संवर्धन व वातावरणीय बदल जनजागृती ई. क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत आहे तसेच समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून मदत करण्यास प्रयत्नशील असते.

फाऊंडेशन मार्फत आतापर्यंत सुरू करण्यात आलेले विविध उपक्रम -

  • ग्रामीण जनतेसाठी निःशुल्क कोविड केअर सेंटर
  • २ लाख कुटुंबांना आर्सेनिक अल्बम हे कोरोना प्रतिबंधात्मक होमिओपॅथी औषध वाटप
  • गावोगावी औषध फवारणी
  • वृक्षारोपण उपक्राअंतर्गत पर्यावरण संवर्धन व जनजागृती
  • गरीब कुटुंब तसेच तृतीयपंथीयांना किराणा किट वाटप